शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बोलाची कढी..

By admin | Updated: October 7, 2014 01:35 IST

गेले दोन दिवस महाराष्ट्र शतप्रतिशत मोदीमय आहे. मोदीही महाराष्ट्राच्या नागरी समस्यांपेक्षा, त्यांचा अमेरिकेचा दौरा, गुजरातविकास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र यावरच जास्त बोलले.

जनक्षोभ की आंधीगेले दोन दिवस महाराष्ट्र शतप्रतिशत मोदीमय आहे. मोदीही महाराष्ट्राच्या नागरी समस्यांपेक्षा, त्यांचा अमेरिकेचा दौरा, गुजरातविकास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र यावरच जास्त बोलले. बोलत आहेत. या दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असे विधान करून मोदींनी सत्ताधारी भाजपा पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल शिवसेनेने मनात धरलेला राग अधिक पसरू नये, असाही एक प्रयत्न केला. दुसरीकडे, केंद्रीय मंत्रीमहोदय माननीय नितीनजी गडकरी यांनी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून मिळेल तितका पैसा घ्या, पण मत भाजपाच्या उमेदवाराला द्या आणि आनंदाने दिवाळी साजरी करा, असा सल्ला देऊन निरभ्र आणि निखळ भारत बनविण्याच्या कामी लागलेल्या मोदी सरकारच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नाची जणू वाटच स्पष्ट केली. तिकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बहुतेक मोठे नेते, ज्यात आता सन्माननीय आदित्य ठाकरे यांचाही समावेश होतो. ते संधी साधून साधून भाजपाने त्यांच्याशी केलेल्या विश्वासघातावर घणाघात करत आहेत. तर राज ठाकरे आणि शरद पवार हेही मोदींना गुजरातचे पंतप्रधान म्हणून मोडीत काढत आहेत. बाकी राष्ट्रीय काँग्रेसचा प्रचार म्हणाल, तर नारायण राणे हे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांना गिऱ्हाईक करता करता अचानक आठवण आली, की मोदींना टारगट भाषेत टार्गेट करू बघताहेत. पण शब्द तेच, तीच भाषा आणि तेच तेच आरोप! राहुल गांधी... त्याचं तर नावच टाकून दिलंय सगळ्यांनी. सोनियांनाही नाही म्हणण्याइतकं धाडस बहुधा अजून गोळा झालेलं नाही म्हणून असेल कदाचित, पण त्या ९ तारखेला महाराष्ट्रदेशी येताहेत. त्या तरी येऊन काय असं बोलणार आहेत म्हणा? शरद पवार, आता दादा सुधारले आहेत म्हणता म्हणता, आपण स्वत:च ग्रामीण शिवीगाळीतले प्रेमळ शब्द हलकेच पेरून भाषणं करू लागलेत. आणि अजितदादा तर पृथ्वीराज चव्हाणांबद्दलच्या त्यांच्या मनातील घट्ट अढीतून बाहेरच यायला तयार नाहीत. बाकी रामदास आठवले किंवा त्यांचे त्यांच्या या, कथित युतीतील सदस्य नेते तर दिसणं सोडा, पुसटसे ऐकायलादेखील येत नाहीयेत. खरं तर यातूनच या वेळच्या निवडणुकीचा एकूण कल स्पष्ट होतो आहे. महाराष्ट्राच्या लोकअडचणींपेक्षा, निवडणुकीत आडकाठीच्या ठरलेल्या आपापसातील मत-मनभेदांवर जाहीरपणे बोलून, परस्परांवर सूड उगवण्याच्या अहमहमिकेत गुंतलेली एकूणच नेतेमंडळी, निवडणूकपश्चात, सत्तेसाठी पुनश्च युती-आघाडी बंधनात एकत्र येतील, येणार आहेत, हे न कळण्याइतकी जनता आता मूर्ख राहिली नाही. मोदी, उद्धव आणि राज यांच्या सभा सोडल्या तर बाकी कुणाही नेत्यांच्या प्रचारसभांना गर्दी नाही. याचा अर्थ या तिघांना लोक गांभीर्याने घेताहेत, असंही ठामपणाने म्हणता येणार नाही. मोदींच्या सभेत लोक कचरा करतात आणि शिवसेनेचे लोक तो उचलून भाजपाचा प्रभाव उघडा पाडू बघतात. पुरेसं बोलकं चित्र आहे. या वेळी लाट जनमताची आहे. ना मैं अण्णा हूँ ना हूँ केजरीवाल। धरतीपुत्र हूँ हम शिवबाके शिवलाल।। भले भले वाहून जाणार आहेत. ना मोदी ना पवार ना गांधी ये है जनक्षोभ की आंधी. जाणता मतदार कुणाही नेत्याच्या निव्वळ बोलाच्या कढीला भाळेल असं आता दिसत नाही. नेमकं आणि निश्चिंत मतदान होणार आहे. ज्याला त्याला आपली लायकी निश्चित कळणार आहे. - राजेंद्र शिखरे