शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:03 IST

दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.

श्रीनगर  - दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मिरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.शहा यांच्या दोनदिवसीय दौºयाची माहिती देताना मुख्य सचिव बी.व्ही. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, राज्यातील अतिरेकी कारवायांविरुद्ध फास आवळण्याचे गृहमंत्री शहा यांनी सांगितले आहे. राज्यातील प्रमुख सार्वजनिक स्थळांची नावे शहीद पोलिसांच्या नावाने असायला हवीत, असेही शहा म्हणाले. यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक, त्यांचे गृह विषयाचे प्रभारी सल्लागार के. विजयकुमार, मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम, उत्तरी सैन्याचे कमांडर ले. जनरल रणबीर सिंह, डीजीपी दिलबाग सिंह, विविध गुप्तचर एजन्सी व निमलष्करी दलाचे प्रमुख या उपस्थित होते. अमित शहा यांनी पंचायत प्रतिनिधींशी चर्चा केली. गतवर्षी ते निवडून आले आहेत. गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच राज्याच्या दौºयावर आले आहेत. (वृत्तसंस्था)शहीद इन्स्पेक्टरच्या कुटुंबियांची घेतली भेटअनंतनागमध्ये १२ जून रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक अरशद अहमद खान यांच्या कुटुंबियांची अमित शहा यांनी गुरुवारी भेट घेतली. शहा यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर बल्गार्दे भागाची घेराबंदी करण्यात आली होती.या हल्ल्यात ३७ वर्षीय खान जखमी झाले होते. त्यांना विशेष उपचारासाठी नंतर दिल्लीला आणण्यात आले. एम्समध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. खान यांच्या कुटुंबात पत्नी, एक वर्षाचा आणि चार वर्षांचा, अशी दोन मुले आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी