शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

झुंडशाही रोखण्यासाठी पावले उचला, अन्यथा गृह सचिवांना कोर्टात यावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:46 IST

विविध राज्यांमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्या (झुंडशाही) रोखण्यासाठी १७ जुलै दिलेल्या आदेशांची १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व राज्यांना दिले.

नवी दिल्ली : विविध राज्यांमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्या (झुंडशाही) रोखण्यासाठी १७ जुलै दिलेल्या आदेशांची १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व राज्यांना दिले. तसे न केल्यास गृह सचिवांनाच न्यायालयात हजर राहावे लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांना बजावले आहे.गोतस्करी वा लहान मुलांची चोरी अशा संशयातून अनेक राज्यांत जमावाकडून निरपराध लोकांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने याआधीही घेतली होती व केंद्र तसेच राज्य सरकारलांना फटकारले होते. १७ जुलैच्या आदेशानंतर अवघ्या तीनच दिवसांनी, २0 जुलै रोजी राजस्थानमध्ये जमावाने रकबार खान नावाच्या व्यक्तीला ठेचून मारले होते. त्यामुळे राजस्थानचे गृह सचिव व पोलीस प्रमुख न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका तेहसीन पुनावाला यांनी केली. त्यावरील सुनावणी आज झाली.या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. मंत्र्यांची समिती नेमून असे प्रकार कसे रोखता येतील, याचा अभ्यास केला जात आहे, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल सांगितले. याचिकाकर्ते व सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिस्रा, अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचुड यांनी राज्यांनी पुरेशी उपाययोजना केली नसल्याचे मत व्यक्त केले व त्या राज्यांना फटकारले.११ राज्यांनी केली अंमलबजावणीआतापर्यंत २९ राज्यांपैकी ११ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांनी अंमलबजावणीबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.त्यामुळे उरलेल्या राज्यांनी आम्ही जुलैमध्ये दिलेल्या आदेशांची एका आठवड्यात म्हणजे १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करावी, ती न करणाºया राज्यांच्या गृह सचिवांना अन्यथा न्यायालयात उभे राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय