शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्यानं घ्या, राजकारणात पडू नका; लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवर PM मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 19:11 IST

या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मारलेल्या उडीसंदर्भात आणि संसदेबाहेरील गोंधळासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. यासंदर्भात त्यांनी जाहीर भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांनी गुरुवारी सकाळी मंत्र्यांसोबत यासंदर्भात चर्चा केली. ते म्हणाले, "आपण सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. मात्र, या मुद्यावर राजकारणात पडण्याची गरज नाही. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे." तत्पूर्वी बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उड्या मारल्या होत्या.

या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. या संपूर्ण प्रकारा दरम्यान, 6 खासदारांनी संबंधित तरुणाला घेरले आणि त्याला पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. 

या घटनेनंतर सामान्य नागरिकांच्या संसदेत प्रवेशाचे नियम आधीच कडक करण्यात आले आहेत. तसेच, शूज आदींचीही तपासणी केली जाणार असून विमानतळा प्रमाणेच स्कॅनर्स बसविण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रेक्षक गॅलरी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

घुसखोरांना लोकसभेत एन्ट्री कशी मिळाली? - लोकसभेत उडी मारणारे दोन तरुण भाजपचे म्हैसूर येथील खासदार प्रताप सिम्हा यांच्या पत्रावर आले होते. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. हे लोक गेल्या तीन महिन्यांपासून पाससाठी संपर्कात होते. आरोपींपैकी एकाच्या वडिलांना ते ओळखतात."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाParliamentसंसद