शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वजन घटविण्याच्या फसव्या जाहिरातींवर कारवाई करा  - उपराष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:23 IST

झटपट वजन कमी करण्याच्या फसव्या आणि बनावट जाहिरातींचा गोरखधंदा बंद करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरकारला केले. अशाच एका जाहिरातीच्या नादी लागून आपण स्वत: १,२३० रुपयांना कसे फसविले गेलो, याचा अनुभवही त्यांनी कथन केला.

नवी दिल्ली : झटपट वजन कमी करण्याच्या फसव्या आणि बनावट जाहिरातींचा गोरखधंदा बंद करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरकारला केले. अशाच एका जाहिरातीच्या नादी लागून आपण स्वत: १,२३० रुपयांना कसे फसविले गेलो, याचा अनुभवही त्यांनी कथन केला.शुक्रवारी हा स्वानुभव राज्यसभेत कथन करताना नायडू म्हणाले की, उपराष्ट्रपती झाल्यानंतर लगेचच २८ दिवसांत वजन कमी करण्याची खात्री देणाºया एका औषधाची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. मी काही लोकांशी बोललो, पण अशा जाहिराती खºया नसल्याचे त्यांनी सांगितले. मी पुन्हा जाहिरात पाहिली. त्यात १,२३० रुपये भरावे लागतील, असे लिहिले होते. त्याप्रमाणे मी तेवढे पैसे भरले. पण त्यांनंतर मला ते औषध पाठविण्याऐवजी एक पाकीट आले. ‘अस्सल औषधासाठी आणखी एक हजार रुपये भरावे लागतील’, असे पत्र त्यात होते!नायडू यांनी सांगितले की, यानंतर मी हे प्रकरण ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे उपस्थित केले. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधित जाहिरात अमेरिकेतून दिली जात असल्ं़याचे आढळून आले.अशा जाहिरातींचे मूळ अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशात असले तरी ही फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत