शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'दीड कोटी घे अन् पतीला माझ्या हवाली कर'; भोपाळमध्ये रंगला 'जुदाई' सिनेमासारखा रिअल ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:19 IST

एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीला आणि मुलींना चक्क दीड कोटी रुपयांची मालमत्ता आणि रोख रक्कम देण्याचे मान्य केले आहे.

९० च्या दशकातील गाजलेला 'जुदाई' सिनेमा तुम्हाला आठवत असेलच, ज्यामध्ये पैशांसाठी पत्नी आपल्या पतीचा सौदा करते. अगदी तसाच काहीसा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडला आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीला आणि मुलींना चक्क दीड कोटी रुपयांची मालमत्ता आणि रोख रक्कम देण्याचे मान्य केले आहे. या बदल्यात तिने आपल्या प्रेमीला स्वतःकडे ठेवण्याची अट घातली असून पत्नीनेही मुलांच्या भविष्यासाठी हा सौदा स्वीकारला आहे.

कार्यालयात जुळलं सूत, घरात पेटला विस्तव

या प्रकरणातील ४२ वर्षीय नायक एका सरकारी विभागात कामाला आहे. याच विभागात त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याशी त्याचे सूत जुळले. हळूहळू या प्रेमप्रकरणाची कुणकुण घरी लागली आणि संसारत वादाची ठिणगी पडली. रोजच्या भांडणांचा त्रास त्यांच्या १६ आणि १२ वर्षांच्या मुलींना होऊ लागला. शेवटी, घरातील वातावरण इतके बिघडले की, मोठ्या मुलीनेच थेट फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

पतीचा ठाम नकार, कोर्टात झाला ऐतिहासिक निकाल

फॅमिली कोर्टात कौन्सिलिंग दरम्यान पतीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्याला आता पत्नीसोबत राहायचे नाही, तर आपल्या प्रेयसीसोबतच जीवन जगायचे आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा वाद न्यायालयात सुरू होता. अखेर, मुलींचे भविष्य आणि स्वतःची आर्थिक सुरक्षितता पाहता पत्नीने एक अट ठेवली. तिने राहण्यासाठी एक आलिशान डुप्लेक्स बंगला आणि २७ लाख रुपये रोख, अशा एकूण दीड कोटींच्या मालमत्तेची मागणी केली.

प्रेयसीने क्षणात मानली अट!

सर्वांना धक्का बसला तो तेव्हा, जेव्हा पतीच्या प्रेयसीने ही अट कोणत्याही आढेवेढे न घेता मान्य केली. "मला माझा जोडीदार हवा आहे, त्यासाठी त्याच्या पहिल्या कुटुंबाला वारऱ्यावर सोडण्याची माझी इच्छा नाही," असे म्हणत तिने दीड कोटींचे पॅकेज देण्याची तयारी दर्शवली. आता हा पती आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन प्रेयसीसोबत संसार थाटणार आहे.

लोभ नाही, तर मुलांची सुरक्षा महत्त्वाची!

'जुदाई' चित्रपटात नायिकेने हा सौदा केवळ पैशांच्या लालसेपोटी केला होता. मात्र, भोपाळच्या या प्रकरणात पत्नीने मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या समझोत्यावर स्वाक्षरी केली आहे. भोपाळच्या फॅमिली कोर्टाच्या इतिहासातील ही पहिलीच अशी घटना आहे, जिथे प्रेयसीने आपल्या प्रेमासाठी एवढी मोठी किंमत मोजली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhopal: Woman pays for husband's love, 'Judaai' unfolds.

Web Summary : In Bhopal, a government employee's lover offered his wife property and cash to relinquish him. The wife agreed for her daughters' future, accepting a deal worth ₹1.5 crore.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार