शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

"टकलावर केस उगवणार!’’, गॅरंटी देणाऱ्या जादुई तेलासाठी लोकांची झुंबड, गर्दीमुळे शहरात ट्रॅफिक जॅम    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:21 IST

Madhya Pradesh News: केस गळती आणि टक्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे सल्ले आजमावले जातात. अशाच केस गळती आणि टक्कल पडलेल्या हजारो लोकांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एकच गर्दी केली होती.

तरुण वयात डोक्यावरील केस घळणे, टक्कल पडणे हा अनेक पुरुषांसाठी तसा चिंतेचा विषय. अकाली पडलेल्या टक्कलामुळे अशा तरुणांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. मग डोक्यावरील केस घळणं, टक्कल पडणं रोखण्यासाठी कधी औषधं, कधी तेल असे अनेक उपाय केले जातात. केस गळती आणि टक्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे सल्ले आजमावले जातात. अशाच केस गळती आणि टक्कल पडलेल्या हजारो लोकांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एकच गर्दी केली होती. येथे टकलावर केस उगवणाऱ्या जादुई तेलासाठी ही गर्दी झालली होती. दिल्लीतून आलेला कुणी सलमान भाई हे तेल लावतो आणि त्यामुळे टकलावर केस उगवतात, अशी वार्ता आजूबाजूला पसरली आणि केस गळीने त्रस्त झालेले लोक हे तेल लावण्यासाठी पोहोचले. मात्र ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा तथाकथित सलमान भाई तिथून पसार झाला.

इंदूरमधील डाकाचाइरा परिसरात टकलावर केस उगवणारं जादुई तेल घेऊन हा तथाकथित सलमान भाई आला होता. त्याच्याकडून हे तेल लावून घेण्यासाठी तरुण, प्रौढ व्यक्तींपासून ते वृद्धांनीही गर्दी केली होती. अगदी पहाटेपासूनच टकलावर तेल लावण्यासाठी या मंडळींनी रांगा लावल्या होत्या. केस गळतीने त्रस्त असलेल्या या व्यक्तींची गर्दी एवढी प्रचंड होती की गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना तैनात करावं लागलं होतं. एवढंच नाही तर परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाला होता.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिल्लीकर असल्याचं सांगणाऱ्या तथाकथित सलमान भाई एक जादूई तेल आणि औषधं लावून केस गळती आणि टकलावर उपचार करण्याचा दावा केला होता. या दाव्यावर विश्वास ठेवून केस गळती आणि टक्कलामुळे त्रस्त असलेले हजारो लोक इंदूरमध्ये जमले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टक्कल पडलेल्या लोकांना पाहून इतर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल