शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी देणार : वक्फ मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:00 IST

झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेज अन्सारी (२४) याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे.

नवी दिल्ली -  झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेज अन्सारी (२४) याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे. ही माहिती गुरुवारी वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिली.अन्सारी याने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याला गेल्या १९ जून रोजी सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली. २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. अन्सारी याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले.अन्सारी याच्या पत्नीला कायद्याची मदत मिळण्यासाठीही वक्फ मंडळ मदत करील, असे अमानतुल्लाह खान म्हणाले. तबरेजच्या पत्नीला पाच लाख रुपयांचा धनादेश पाठविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, तो तिला देण्यासाठी मी बहुधा तेथे जाईन. वक्फ मंडळात आम्ही तिला नोकरीही देऊ आणि तिला विधिसाह्यही देऊ, असे खान यांनी सांगितले. अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.तबरेज अन्सारीच्या झारखंडमध्ये जमावाकडून झालेल्या हत्येने मला तीव्र वेदना झाल्या. दोषी लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले होते. ते म्हणाले होते की, झारखंड, पश्चिम बंगाल किंवा केरळसह देशात कुठेही घडलेल्या हिंसाचाराच्या सगळ्या घटनांना एकाच मापात मोजले पाहिजे व त्यात कायद्याने त्याची भूमिका पार पाडली पाहिजे.

टॅग्स :Jharkhandझारखंड