शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे दर 90 रुपयांवर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 14:17 IST

महागाई वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. त्यामुळे सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेलं पेट्रोल लवकरच 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतं. डिझेलच्या दरातही वाढ होणार असल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच वस्तू महाग होऊ शकतात. 

अमेरिकेनं सीरियावर हवाई हल्ला चढवल्यानं मध्य पूर्व आशियातील वातावरण तापलं झालं आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. या घटनांचे परिणाम इंधनाच्या दरांवर होऊ शकतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 71.85 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल इतका आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती पाहता, लवकरच हे दर 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या घरात जाऊ शकतात. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो. जगातील सर्वात मोठी वित्त आणि संशोधन कंपनी असलेल्या जेपी मॉर्गननं याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2014 नंतर प्रथमच इतकी मोठी उसळी घेतली आहे. 'सीरियामधील स्थिती अतिशय भीषण होती. त्यातच आता अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे ती आणखी बिघडू शकते. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून इराणवर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर होऊ शकतो,' असं जेपी मॉर्गन कंपनीनं म्हटलं आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा थेट फटका भारताला बसू शकतो. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 82 रुपये प्रति लिटर इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 80 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्यास पेट्रोल 90 रुपयांवर जाऊ शकतं.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल