पाथर्डी फाट्यावर रिक्षाचालकावर तलवारीने वार
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
इंदिरानगर : मागील भांडणाची कुरापत काढून रिक्षाचालकावर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़७) रात्री पाथर्डी फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हाणामारीचा तसेच बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पाथर्डी फाट्यावर रिक्षाचालकावर तलवारीने वार
इंदिरानगर : मागील भांडणाची कुरापत काढून रिक्षाचालकावर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़७) रात्री पाथर्डी फाटा परिसरात घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हाणामारीचा तसेच बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील रिक्षा थांब्यावर गोरख सोमनाथ सिरसाठ (३६,रा़पाथर्डी गाव) हा रिक्षाचालक उभा होता़ त्यावेळी संशयित यश गांगुर्डे, दीपक रोकडे, पवन दोंदे, अजय सावंत (सर्व राहणार पाथर्डी गाव) हे एका वाहनातून आले व त्यांनी शिवीगाळ करीत सिरसाठला मारहाण करण्यास सुरुवात केली़ यातील काही संशयितांनी तलवार व चॉपरने वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे़दरम्यान या घटनेतील काही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़ (प्रतिनिधी)