शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

स्वाईन फ्लूचा विळखा, फक्त 8 महिन्यात एकूण 1094 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 11:09 IST

महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात जास्त प्रभावित असल्याचं सागंण्यात आलं आहे

नवी दिल्ली, दि. 24 - देशभरात स्वाईन फ्लूचा विळखा वाढत चालला असून मृतांचा आकडा एक हजाराच्या पुढे पोहोचला आहे. स्वाईन फ्लूमुळे देशभरात एकूण 1094 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. फक्त गेल्या तीन आठवड्यात स्वाईन फ्लूमुळे 342 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात जास्त प्रभावित असल्याचं सागंण्यात आलं आहे. गुजरातमध्ये एकूण 437 तर महाराष्ट्रात 381 जणांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राजस्थान, केरळ आणि दिल्लीतही स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाले आहेत. स्वाईन फ्लूची लागण होणा-यांमध्ये तरुण आणि आजारी लोकांची संख्या जास्त आहे. अशा लोकांना स्वाईन फ्लूची लागण लगेच होते. सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. 

कर्नाटकमध्ये 2805 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तामिळनाडूत एकूण 2956 रुग्ण सापडले आहेत. मात्र येथील रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत असल्याचं दिसत आहे. येथील फक्त 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 

स्वाइन फ्लूची लक्षणे - स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.

आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे?फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तेव्र स्वरुपाचे असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तिन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.

स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो?नव्या स्वैअन फ्लू विषाणूं तीव्र संसर्ग पसरवतात, याचा प्रसार माणसापासून माणसाला होतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणा-या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्ष करेल तिथे तिथे संसर्ग होऊ शकतो.

दक्षता कशी घ्यावी?असे लोक जे खूप आजारी आहेत व ज्यांना स्वाइन फ्लू असण्याची शक्यता आहेत अशांना प्रतिबंधात्मक औषधे दिली जाऊ शकतात व त्यातून काही प्रमाणात बचाव होऊ शकतो. अशी औषधे ७०% ते ९०% प्रभावी ठरतात. पण ह्या औषधांचावापर डॉक्टर व त्या व्यक्तीच्या आजाराच्या स्वरुपावर अवलंबून असतात.

टॅग्स :Indiaभारत