शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 21:42 IST

Swati Maliwal Assault Case : विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

नवी दिल्ली :  स्वाती मालीवाल गैरवर्तनप्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तीस हजारी न्यायालय म्हणाले की, विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे, असे अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला आधीच अटक करण्यात आली आहे, त्यामुळे त्यावर सुनावणी करण्याचे कोणतेही औचित्य नाही. याचिका निष्प्रभ ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. वकील एन हरिहरन म्हणाले की, आरोपांवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. विभव कुमार यांची सध्या काय स्थिती आहे हे आम्हाला माहीत नाही. तसेच, स्वाती मालीवाल जे आरोप करत आहेत ते समजण्यापलीकडचे आहेत. विभव कुमार असे अशी मारहाण कशासाठी करतील, हे समजण्यापलीकडचे आहे.

वकील एन हरिहरन म्हणाले, " स्वाती मालिवाल यांनी आरोप केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणीही असे कृत्य का करेल? तेथे शेकडो लोक उपस्थित होते, जर स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला झाला असता तर त्या ओरडल्या असत्या. तसेच, त्यांच्या आवाज तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी नक्कीच ऐकला असता. घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आधी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे, मात्र स्वाती मालिवाल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, हा थेट मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न आहे.

स्वाती मालीवाल प्रकरणात विभव कुमार यांना अटकस्वाती मालीवाल यांच्यासोबत कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (१८ मे) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. विभव कुमार यांनी आपल्या वकिलामार्फत ३० हजार रुपयांच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय