शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

स्वराज यांना भोपाळ, जावडेकरांना पुण्यातून मिळू शकते उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:39 IST

भाजपा नेतृत्वाचा मनोदय; शत्रुघ्न सिन्हांविरुद्ध रविशंकर प्रसाद या संभाव्य लढतीचीही चर्चा

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आपला विचार कदाचित बदलावा लागण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविण्याचा भाजपा नेतृत्वाचा मनोदय आहे. स्वराज यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना मध्य प्रदेशातील विदिशाऐवजी भोपाळमधून तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.प्रचारासाठी फार दगदग न होता भोपाळमधून सुषमा स्वराज सहजी निवडून येतील, असे भाजपा नेत्यांना वाटते. तर विदिशा या मतदारसंघातून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. सुषमा स्वराज दिल्लीतील राजकारणात सध्या प्रचंड सक्रिय असून त्यामुळे त्या निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहणे शक्यच नाही असे राजकीय निरीक्षकांना वाटते.पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकाश जावडेकर यांनीच भाजपा श्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यकर्तृत्वामुळे जावडेकरांचे महत्व त्यांच्या पक्षामध्ये वाढले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होऊ शकतो. त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला निवडणुकांमध्ये अडकवून ठेवण्यापेक्षा पक्षकार्याची मोठी जबाबदारी भविष्यात गोयल यांच्या सोपविली जावी असे काही भाजपा नेत्यांचे मत आहे.पाटणा साहिब मतदारसंघात रंगणार जोरदार लढतकेंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद हे पाटणा साहिब येथून निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. या मतदारसंघातून याआधी निवडून आलेले भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हेही याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. तशी घोषणा त्यांनी याआधीच केली आहे.शत्रुघ्न सिन्हांप्रमाणेच रविशंकर प्रसाददेखील कायस्थ आहेत. त्यामुळे दोघांचा मुकाबला झाला तर तो खूपच चुरशीचा होईल. जर रविशंकर या ठिकाणाहून लढले नाहीत तर ऋतुराज सिन्हा यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ते राज्यसभा सदस्य व एसआयएस सिक्युरिटीचे मालक आर. के. सिन्हा यांचे पुत्र आहेत.अजित डोवाल यांच्या मुलाला उमेदवारी?राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्य डोवल यांना उत्तराखंडमधून मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sushma Swarajसुषमा स्वराजPrakash Javadekarप्रकाश जावडेकर