शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

सुझान खानने १.८७ कोटीला फसवले

By admin | Updated: June 20, 2016 05:07 IST

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: डिझायनर अससेल्या सुझानने आपण वास्तुविशारद असल्याचे

पणजी : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: डिझायनर अससेल्या सुझानने आपण वास्तुविशारद असल्याचे सांगून कंत्राट मिळविल्याचे पणजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एम्गी प्रोप्रायटर या खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुधित गुप्ता यांनी ही तक्रार दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुझान हिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.कंपनीचे वकील डॉ. अरुण ब्राज डिसा यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी : सुझानने स्वत:ला वास्तुविशारद असल्याचे भासवून कंपनीच्या एका कंत्राटासाठी अर्ज केला व ते मिळविलेही. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात शिरदोण येथे कंपनीचा नायरा कॉम्प्रेक्स उभारण्याचे हे कंत्राट होते. त्यासाठी तिला १.८७ कोटी रुपये कंपनीकडून दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे ती व्यावसायिक वास्तुविशारद नसल्याचा कंपनीला संशय आला. कंपनीने तिच्याकडे काउन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडून तिला मिळालेला नोंदणी क्रमांक विचारला तेव्हा तिने तो देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीचा संशय बळावल्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)