शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार

By बाळकृष्ण परब | Updated: December 31, 2020 09:19 IST

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे.

ठळक मुद्देसुवेंदू यांचे वडील आणि दोन भाऊ लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहेतसुवेंदू यांचे वडील आणि एक भाऊ हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेतकाही दिवसांपूर्वी मिदनापूर जिल्ह्यात झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सभेला अधिकारी कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते

कोलकाता - पश्चिम बंगालमधील मोठा जनाधार असलेल्या नेत्यांपैकी एक असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करून ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींना अजून एक दणका देण्याच्या तयारीत असून, सुवेंदू यांचे वडील आणि दोन भाऊ लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहेत. सुवेंदू यांचे वडील आणि एक भाऊ हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. बरेच दिवस नाराज असलेले तृणमूल काँग्रेसमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी ममतांची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब भाजपावासी होण्याच्या तयारीत आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. पण सुवेंदू अधिकारी यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुवेंदू यांचे वडील आणि तृणमूलचे खासदार शिशिर अधिकारी आणि भाऊ खासदार दिव्येंदू अधिकारी तसेच तृणमूलचे नेते असलेले धाकटे भाऊ सौमेंदू अधिकारी लवकरच भाजपावासी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मिदनापूर जिल्ह्यात झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सभेला अधिकारी कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते.दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांच्या बंडानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांना पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कांथी नगरपालिकेच्या प्रशासक बोर्डावरून हटवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सौमेंदू अधिकारी हे सुवेंदू अधिकारी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमांना मदत करत असल्याचा आरोप तृणमूलच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबामागे मोठा जनाधार असून, सुमारे ४० विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस