शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद ‘सिग्नल’; संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:43 IST

‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले.  जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते. 

कोलकाता : हॅम रेडिओ ऑपरेटरला गेल्या दोन महिन्यांत दक्षिण बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर बंगाली, उर्दू आणि अरबी भाषांतील संशयास्पद सिग्नल आढळले असून, यामुळे संभाव्य दहशतवादी कारवायांची चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बांगलादेशात सुरू असलेली अशांतता आणि वाढत्या भारतविरोधी वक्तव्यांदरम्यान हे सिग्नल समोर आले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये प्रथमच उत्तर २४ परगणामधील बशीरहाट आणि बोनगाव, तसेच दक्षिण २४ परगणामधील सुंदरबनमध्ये बंगाली, अरबी आणि उर्दू भाषांतील हा संवाद आढळून आला. पश्चिम बंगाल रेडिओ क्लबचे सचिव अंबरीश नाग बिस्वास यांनी सांगितले की, ‘हे संशयास्पद रेडिओ सिग्नल मध्यरात्रीनंतर ०१:०० ते ०३:०० वाजेदरम्यान पकडले गेले.  जानेवारीच्या मध्यभागी गंगासागर मेळ्यादरम्यानही, अनेक संशयास्पद सिग्नल मिळाले होते. 

संबंध तणावपूर्णगेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची सत्तेवरून हकालपट्टी झाल्यानंतर ढाकामध्ये वाढलेल्या तणावादरम्यान सीमा सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे समोर आला आहे. ५ ऑगस्ट रोजी हसीना यांच्या भारत दौऱ्यापासून दोन्ही शेजारी देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे.४,०९६ किमी लांबीची सीमा भारत आणि बांगलादेशदरम्यान आहे. त्यापैकी २,२१७ किमी पश्चिम बंगालशी जोडून असून, त्याचा बराचसा भाग खुला आहे.

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशterroristदहशतवादी