दिल्लीतील संसद भवनाजवळील रेल भवन चौकात संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. सीआयएसएफच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यत दिले.
एका संशयास्पद तरुणाने संसद भवनात भिंत चढून प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सुरक्षा यंत्रणांनी संसद भवनाजवळील रेल भवन चौकात संशयास्पद हालचालींमुळे एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
सीआयएसएफच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे आणि त्याच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत त्याच्या झडतीतून किंवा कागदपत्रांमधून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल उघड झालेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आवश्यक माहिती गोळा केली जात आहे.