श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे. येथील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमी गोळीबार केला. तसेच परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन संशयास्पद व्यक्तींना पाहिले आहे. ही घटना पहाटे 30 वाजण्याच्या दरम्यानची आहे. गोळीबारामुळे काही लोकांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत कुणाचाही मृतदेह हाती लागलेला नाही. तसेच हा कुठल्याही प्रकारचा हल्ला असण्याच्या शक्यतेलाही पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
उरीमधील आर्मी कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली, गोळीबारानंतर शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 09:52 IST
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे.
उरीमधील आर्मी कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली, गोळीबारानंतर शोधमोहीम सुरू
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे.नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले.च परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.