शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशावर सस्पेन्स; सोनिया गांधी विचारविनिमय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:23 IST

उदयपूरच्या चिंतन शिबिरातही मंथन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. 

हरीश गुप्ता नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पी. के. यांच्या बहुप्रतीक्षित काँग्रेस प्रवेशाला विलंब होताना दिसत आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्याऐवजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत अजून विचार करू इच्छितात. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी अधिकार असलेला कृती गट (ईएजी) - २०२४ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ईएजीच्या सदस्यांची नावेही आज रोखण्यात आली. राजस्थानातील उदयपूर येथे १३ मेपासून तीन दिवसांचे चिंतन शिबिर होत असून, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

साहजिकच, सोनिया गांधी यांना या विषयावर व्यापक विचारविनिमय करायचा असल्याने काँग्रेसने पीके यांच्या प्रवेशाची घोषणा पुढे ढकलली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सोनिया गांधी या अतिशय सावधान, सतर्क राहून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापक विचारविमर्श करतात. तथ्य हे आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत योग्य वेळी ठोस निर्णय होईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. गतवर्षीच्या अपुऱ्या राहिलेल्या चर्चेनंतर अलीकडच्या काळात गांधी कुटुंबीय आणि पीके यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. समितीने याबाबतचा आपला अहवाल सोनिया गांधी यांना सोमवारी सोपविला. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. नव संकल्पासाठी उदयपूर येथे चिंतन शिबिर होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांसह पक्षात असे अनेक जण आहेत ज्यांनी पीके यांना महत्त्वाचे स्थान देण्यास विरोध केला आहे. कारण, ते स्थिर निष्ठा नसलेले व्यक्ती आहेत. त्याऐवजी पीके यांच्यासोबत काम करण्याची व्यवस्था असावी, असाही सल्ला या नेत्यांनी दिला आहे. 

पीके करणार टीआरएससाठी काम?

हैदराबाद : तेलंगणातील सत्तारूढ टीआरएसने रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आय-पीएसी कंपनीसोबत (इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) काम करण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील मंत्री के.टी. रामाराव यांनी याला दुजोरा दिला. तथापि, सूत्रांनी सांगितले की, किशोर यांनी यापूर्वीच आय-पीएसीपासून स्वत:ला वेगळे केले आहे. ही कंपनी देशातील अनेक पक्षांसोबत काम करते. प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली होती.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस