शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:09 IST

Jammu and Kashmir: गेल्या २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे धोका अद्याप टळलेला नसल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू: जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता जम्मूमधील कुंजवानी-रत्नूचक भागात पुन्हा एकदा ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली असून, गेल्या २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे धोका अद्याप टळलेला नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच वायुदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपवण्यात आला आहे. (suspected drone activity was seen late night in Kunjwani Ratnuchak area of Jammu)

सोमवारी कालूचक मिलिट्री स्टेशनजवळ ड्रोन आढळून आला होता, असे सांगितले जात आहे. यानंतर सोमवारी रात्री उशिरा कुंजवानी-रत्नूचक भागात ड्रोन आढळून आला. मध्यरात्री सुमारे अडीच ते तीन वाजता ड्रोन दिसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अँटी ड्रोनसह कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच ड्रोन दिसल्यास तातडीन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

अलर्ट कायम

सलग दोन दिवस ड्रोनच्या हालचाली दिसल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अलर्ट कायम आहे. भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. कालूचक येथे ड्रोन आढळल्यानंतर कुंजवानी, पुरमंडळ मोड, बाडी ब्राह्मणा, रत्नूचक, राष्ट्रीय हायवे येथे शोधमोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलीस आणि भारतीय सेनेच्या संयुक्त पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. सोमवारी रात्री दिसलेला ड्रोन एक होता की तीन याबाबत अधिक तपास केला जात आहे. 

पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

दरम्यान, जम्मू येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावर दोन ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहिल्यांदाच मानवरहित ड्रोनचा वापर केला, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात भारतीय वायुदलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. पहिला स्फोट शहरालगच्या सतवारी भागातील भारतीय वायुदलाच्या हवाई तळावरील अत्यंत सुरक्षित एक मजली इमारतीत तर  दुसरा खुल्या जागेत झाला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरindian air forceभारतीय हवाई दल