शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:22 IST

सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देराजकारणात सक्रीय राहणार - सुषमा स्वराजप्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा 2019 लढवणार नाही - स्वराज निवडणूक न लढवण्याचा निर्णय अमित शहांना सांगितला - स्वराज

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची घोषणा केली आहे. सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना स्वराज यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. 

'मी राजकारणातून निवृत्ती घेत नाहीय, तर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे',असा टोला स्वराज यांनी शशी थरुर यांना हाणला आहे. सुषमा स्वराज यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) इंदुरमध्ये पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली. सुषमा स्वराजांच्या या निर्णयावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटले की, 'अनेक राजकीय मतभेद असतानाही, सुषमा स्वराज राजकारण सोडत असल्यानं मी दुःखी झालो आहे'. 

शशी थरुर यांच्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी अतिशय चतुराईनं उत्तर दिलं. थरुर यांना धन्यवाद देत त्यांनी म्हटलं की, ''आपण दोघांनीही पक्षाकडून आपल्याला देण्यात पदांवर कार्य करत राहावे, अशी मी आशा व्यक्त करते''.   दरम्यान, इंदुरमधील पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा यांनी असेही सांगितले की, माझ्या  निर्णयाची कल्पना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. परंतु भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागत आहे. अशातच कामाचा त्यांच्यावर ताण पडतो. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या त्या मध्य प्रदेशात असून, भाजपाचा प्रचार करत आहेत.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजShashi Tharoorशशी थरूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९