शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या पंतप्रधानांना खोकल्याची उबळ आल्यानंतर सुषमा स्वराजांनी पाण्याचा ग्लास केला पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 20:46 IST

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. काल भारत आणि नेपाळमध्ये आठ महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानंतर...

नवी दिल्ली, दि. 25 - नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. काल भारत आणि नेपाळमध्ये आठ महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानंतर  हैदराबाद हाऊसमध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसमवेत एक संयुक्त पत्रकार परिषद झाली.  यावेळेस बोलताना देउबांना खोकल्याची उबळ आलेली पाहून भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना पाणी दिले. नेपाळचे पंतप्रधान देऊबांना बोलताना त्रास होत होता. त्यांच्या बोलण्यावरुन ते दिसतही होतं. सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्यांच्या आवाजावर त्याचा परिणाम होत होता. हे सर्व पाहून समोरच बसलेल्या सुषमा स्वराज यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वत:च उठून त्यांना पाण्याचा ग्लास दिला.  काम, पद किंवा दर्जा यापेक्षा माणुसकीने दुसर्‍यांची कदर करा ही आपल्या देशाच्या संस्कृतीची शिकवण आहे. याच गोष्टीचा अनुभव सुषमा स्वराज यांच्या कृतीतून दिसून आला असे म्हणाले तर वावगे वाटायला नको.  सतत खोकल्याचा त्रास होत असतानाही देउबा यांनी आपले वाचन सुरुच ठेवलं होतं. पण त्यांचा त्रास पाहून पंतप्रधान  मोदींनी त्यांच्यासमोरील बाटलीचे झाकण उघडले आणि सुषमा स्वराज यांनी बाटलीतील पाणी ग्लासात ओतून देउबांना दिले.  हा सर्व प्रकार पाहून देउबाही चकित झाले. वाचन करण्यात व्यस्त असलेल्या देउबांना सुरुवातील सुषमाजी पाणी घेऊन उभ्या आहेत हे कळलेच नाही. थोड्या वेळाने त्यांना पाहून देउबादेखील चकीत झाले. त्यांनी उपस्थितांची माफी मागत पाण्याचा घोट घेतला.सुषमा स्वराज यांच्या या माणुसकीच्या कृत्यामुळे सद्या सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली जात आहे. प्रत्येकजण त्यांच्या या कृतीला सलाम करत आहेत. सुषमा स्वराज सारख्या परराष्ट्रमंत्री मिळाल्याचे काहीनी आभारही व्यक्त केले.  

दोन्ही देशांमध्ये हे झाले आहेत करार -50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करारभूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करारनेपाळचा सांस्‍कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्यभूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्यमेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करारअंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करारमूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करारभारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत