शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Sushma Swaraj's Last Tweet: सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेलं; वाचून कराल सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:31 IST

एम्समध्ये वयाच्या ६७ व्या प्राणज्योत मालवली

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे स्वराज यांनी अवघ्या तीन तासांपूर्वीचं राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं ट्विट केलं होतं.मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री आपल्या कामानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्वराज यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. 'प्रधानमंत्रीजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहात होते,' अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी काश्मीरमधून ३७० कलम हटवल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. कलम ३७० काढून टाकणारं विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या.  प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्वराज यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नाही. मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्या कामानं वेगळी ओळख निर्माण केली. अवघ्या एका ट्विटवर स्वराज यांनी अनेकांना मदत केली. परदेशात अडकलेल्या, मदतीची आवश्यकता असलेल्यांना अनेक गरजूंच्या मदतीला त्या धावून गेल्या. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज