शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणा-या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात उद्या संसदेत देणार निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:51 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत.

ठळक मुद्देसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी पाकिस्तानात जाधव कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदवला.कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला जी वागणूक देण्यात आली त्याचा आम्ही निषेध करतो.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत. या संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत. आधी राज्यसभेत सकाळी 11 वाजता त्यानंतर लोकसभेत 12 वाजता त्यांचे भाषण होईल. 

चार दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी पाकिस्तानात जाधव कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदवला. 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची पत्नी चेतना आणि आई अवंती यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने अत्यंत हिन दर्जाची वागणूक त्यांना दिली. 

कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला जी वागणूक देण्यात आली त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणा अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. शिवसेना, अण्णाद्रमुक, तृणमुल काँग्रेस या पक्षांनीही घोषणाबाजी करुन पाकिस्तानचा निषेध केला. भारताने या मुद्यावर शांत बसू नये असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. 

कुलभूषण यांच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीहीकुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले.

बुट जप्त केलेकुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजKulbhushan Jadhavकुलभूषण जाधव