शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: मनाचा मोठेपणा... चूक लक्षात येताच सुषमा स्वराज यांनी मागितली होती माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:19 IST

Sushma Swaraj Death: 'सॉरी' म्हणायला खूप धाडस लागतं.

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. गेले बरेच महिने त्या आजारी होत्या, पण असं काही होईल, हे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. स्वाभाविकच, त्यांचं जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलंय. सुसंस्कृत, अभ्यासू, विश्वासू, कर्तव्यतत्पर राजकारणी देशानं गमावल्याची भावना व्यक्त होतेय. सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना प्रसारमाध्यमांमधून, नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून, सोशल मीडियावरून उजाळा दिला जातोय. अशीच एक, सुषमा स्वराज यांच्या मनाचा मोठेपणा दाखवणारी आठवण म्हणजे त्यांनी मागितलेल्या माफीची.  

वास्तविक, 'सॉरी' म्हणायला खूप धाडस लागतं. आजच्या राजकारणात तर गंभीर चुका करणारी मंडळीही माफी मागायला तयार होत नाहीत. त्यांचा अहंकार दुखावतो. परंतु, अनेक महत्त्वाची पदं, जबाबदाऱ्या सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांनी, आपली चूक लक्षात येताच जाहीर माफी मागायलाही मागेपुढे पाहिलं नव्हतं.  विशेष म्हणजे, त्यावेळी त्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री होत्या.

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजBJPभाजपा