नवी दिल्लीः माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजकारणातील तेजस्वी अध्याय समाप्त झाल्याची भावना व्यक्त केली आहे.जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या होत्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. पक्षाच्या पातळीवर त्यांचा नेहमीच आदर आणि सत्कार केला आहे.
Sushma Swaraj Death: राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 07:17 IST