शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death : मोठ्या मनाने केले 'त्या' हुबेहूब सुषमा साकारणाऱ्या लहान मुलीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:30 IST

व्यक्ती पदाने मोठी असली तरी तिच्या कृतीवर तिच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

पुणे : व्यक्ती पदाने मोठी असली तरी तिच्या कृतीवर तिच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. असाच अनुभव काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत राकेश शर्मा या व्यक्तीने घेतला. शर्मा यांच्या मुलीने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वराज यांच्यासारखा पेहराव केला आणि स्वतः स्वराज यांनी तिचे कौतुकही केले. त्यांनी ट्विटरवर दिलेली ही दाद अनेकांनी रिट्विट केलेली बघायला मिळाली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले.छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 67 वर्षांच्या होत्या. मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. स्वराज यांच्या कार्यकालात देशातील जनतेशी त्या ट्विटरच्या माध्यमातून थेट जोडल्या गेल्या होत्या. देशाबाहेर संकटात असणाऱ्या अनेकांना त्यांनी तात्काळ मदत केल्याची उदाहरणेही त्यावेळी बघायला मिळाली. त्यांनी मदत केल्याचे, कौतुक केल्याचे अनेक ट्विट त्या काळात बघायला मिळाले होते. अगदी मृत्यूपूर्वीही काही तास आधी त्या ट्विटरवर कार्यरत होत्या. अशीच एक घटना 2016सालीही बघायला मिळाली होती. ही घटना आहे 13 ऑगस्ट 2016ची. शर्मा यांनी ट्विटरवर त्यांच्या लहान मुलीने स्वराज यांच्याप्रमाणे साडी आणि जॅकेट घातल्याचा फोटो ट्विट केला. तिने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वराज यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. या ट्विटला स्वराज यांनी मोठ्या मनाने प्रतिसाद दिला. त्यावेळी स्वराज यांनी 'ओहह..आय लव्ह युअर जॅकेट' अशा शब्दात तिचे कौतुक केले. अर्थात त्यावेळी त्यांच्या या उत्तरामुळे अनेक युजर्सनी त्यांचे कौतुक केले होते.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज