शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Sushma Swaraj Death: भाजपाची मुलुखमैदानी तोफ शांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 03:51 IST

सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे. हरियाणात वयाच्या २५ व्या वर्षी कॅबिनेटमंत्रीपद, २७ व्या वर्षी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात परराष्ट्र खात्यासह महत्वाच्या पदाचे यशस्वी काम पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी राजकारणात खूप कमी वयात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. सुषमा स्वराज नेहमीच म्हणायच्या की, राजकारण हे करियर म्हणून नव्हे, तर मिशन म्हणून आपण स्वीकारले आहे. घर आणि राजकारण यात कुणालाही प्राधान्य देण्याऐवजी मी यात संतुलन साधले आहे.हरियाणा हे राज्य स्त्रियांच्या बाबतीत जुनाट रुढीवादी. इथल्या स्त्रिया सार्वजनिक जीवनात अभावानेच दिसतात. अशा परिस्थितीतही सुषमा स्वराज यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी झेप घेतली ती निश्चितच कौतुकास्पद होती. चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात शिकताना सुषमा स्वराज यांचा ओढा मार्क्सवादी साहित्याकडे होता. समाजवादी विचारांच्या स्वराज कौशल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती मिझोरामचे राज्यपालही होते. बांसुरी ही त्यांची एकुलती एक मुलगी. सुषमा आणि स्वराज कौशल हे दोघेही व्यवसायाने वकील.घरची जबाबदारी सांभाळून पक्षकार्यकर्त्या, पक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्त्या, प्रचारक, केंद्रीय मंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रात कॅबिनेट मंत्री अशा अनेक जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. आपल्या आक्रमक भाषणांमुळे सुषमा स्वराज संसदेच्या सभागृहात नेहमीच चर्चेत रहायच्या. निवडणूक प्रचार असला की, भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून सुषमा स्वराज यांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह असायचा. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक भाषणातून त्या विरोधकांवर तूटून पडत असत. भाजपची ही मुलुखमैदानी तोफ आज शांत झाली आहे. त्यांना विनम्र अभिवादन.>गाजलेले भाषणसुषमा स्वराज यांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ७३व्या आमसभेत बोलताना आमचा शेजारी देश दहशतवादाचा तज्ज्ञ असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या की, आमच्या देशात दहशतवाद दूरवर्ती आणि दुर्गम भागात निर्माण होत नाही. आमच्या पश्चिम सीमेच्या पलीकडे तो तयार होतो. आमचा शेजारी देश फक्त दहशतवादाचा आधार वाढविण्याच्या बाबतीतच तज्ज्ञ आहे, असे नव्हे तर दुतोंडी भूमिका घेऊन द्वेषभाव लपविण्यातही तो प्रचंड वाक्बगार आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज