शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

काहींच्या कुरापतींमुळे झालो राज्यपाल, मुख्यमंत्रीपद गेल्याची सल कायम- सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 21:33 IST

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले

नागपूर :  मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री या प्रवासादरम्यान त्यांना अनेकदा संघर्षांनादेखील सामोरे जावे लागले. या वक्तव्यावरुन २००४ साली त्यांच्या मनाला झालेली जखम अद्यापही भरून निघाली नसल्याचे दिसून येत आहे. 

रविवारी नागपुरात सुशीलकुमार शिंदे यांनी अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात वरील वक्तव्य केले. सुशीलकुमार शिंदे यांनी १८ जानेवारी २००३ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र पावणेदोन वर्षातच त्यांच्याकडे आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली व ४ नोव्हेंबर २००४ ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चांना उधाण आले होते. मात्र शिंदे यांनी यावर मौनच बाळगले होते.

रविवारी मात्र सार्वजनिक मंचावरून त्यांनी काही व्यक्तींच्या कुरापतीमुळे आपले मुख्यमंत्रिपद गेले, असा दावा केला. शिंदे यांनी हे वक्तव्य करून त्यांच्या मनातील सल व्यक्त केली. शिंदे यांच्या कुरापती करणारे राजकीय क्षेत्रातील ते लोक कोण व शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.