शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "रिया माझ्या मुलाला विष द्यायची; ती खुनी आहे, तिला तातडीनं अटक करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 10:36 IST

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा रियावर पहिल्यांदाच थेट आरोप

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आल्याचा दावा त्याचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. सिंह यांनी प्रथमच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तींवर अतिशय थेटपणे आरोप केले आहेत. रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू असताना दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयनं तपास हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. रिया अमली पदार्थ विकत घ्यायची अशी माहिती काही व्हॉट्सऍप चॅट्समधून समोर आली आहे. रियानं सुशांतला अमली पदार्थ दिले, असेही आरोप झाले आहेत. तशी माहिती व्हॉट्सऍप चॅटमधून समोर आली आहे. अमली पदार्थ दिले जात असल्याची कल्पना सुशांतला होती का, की त्याला नकळतपणे अमली पदार्थ दिले जात होते, याचा तपास आवश्यक असल्याचं सुशांतच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. सुशांतला त्रास देण्यात आल्याचा आरोप त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती यांनी इन्स्टाग्रामवरून केला आहे. याआधी सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्यांच्याकडून रियावर हत्येचा आरोप केला जात आहे. सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. सुशांतसोबत काम करणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज यांची अनेकदा चौकशी झाली आहे. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती