शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणाचे आदेश : बुलेट ट्रेनचे आणखी ६ सर्वेक्षण रुळावर; अहमदाबाद-मुंबईच्या कामाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:34 IST

सध्याच्या फर्स्ट क्लास एसी तिकिटाच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडे अपेक्षित.

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय, रेल्वे मंत्रालयाने मुंबई- हैदराबाद कॉरिडॉरसह आणखी सहा बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

सध्या अहमदाबाद-मुंबई हा ३२० -३५० किमीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प (एमएएचएसआर)  कार्यान्वित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत श्रीकांत एकनाथ शिंदे आणि इतरांना सांगितले की, सरकार आधीच दोन सेमी -हायस्पीड रेल्वे चालवीत आहे आणि अशा १०० हून अधिक रेल्वे इंटिग्रेटेड कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्याची योजना आहे. सध्याच्या फर्स्ट क्लास एसी तिकिटाच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडे अपेक्षित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर सुरू केलेल्या पहिल्या अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धर्तीवर मंत्रालयाने नवीन हाय स्पीड रेल्वे (एचएसआर) कॉरिडॉर निश्चित केले आहेत. 

मुंबई- नागपूर आणि मुंबई -हैदराबाद या प्रकल्पांसह दिल्ली -वाराणसी, दिल्ली -अहमदाबाद, चेन्नई -बंगळुरू- म्हैसूर, दिल्ली -चंडीगड-अमृतसर आणि वाराणसी -हावडा असे सात मार्ग आहेत. तथापि, सरकारने स्पष्ट केले आहे की, यातील एकाही कॉरिडॉरला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. 

नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगिर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी आणि शाहपूर

बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाचे अडथळेअहमदाबाद -मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्प अद्यापही भूसंपादनाच्या अडथळ्यांशी झुंजत आहे. यासाठी आवश्यक एकूण १३९६ हेक्टर जमिनीपैकी ९० टक्के जमीन (१२२४ हेक्टर) संपादित करण्यात आली आहे, असे सरकारने सांगितले. महाराष्ट्रातील उर्वरित जमीन संपादित करणे एमएएचआरएसला अवघड जात आहे. कारण, ठराविक भागात गावकरी अजूनही विरोध करत आहेत. आता सत्तांतर झाल्याने ही प्रक्रिया जलदगतीने होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन