शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य...तब्बल 30 देशांच्या सुंदऱ्या 'मतदान जागृती'साठी अवतरल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 22:24 IST

निवडणूक प्रचारादरम्यान एखादा हिरो- हिरोईन आणण्याचा प्रघात सगळीकडेच आहे. पण एक नाही, दोन नाही तब्बल 30 देशांच्या सुंदऱ्या जर मतदान जागृतीसाठी आल्या तर...

बहादुरगड : भारतात सध्या लोकशाहीचा महायज्ञ सुरु आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एखादा हिरो- हिरोईन आणण्याचा प्रघात सगळीकडेच आहे. पण एक नाही, दोन नाही तब्बल 30 देशांच्या सुंदऱ्या जर मतदान जागृतीसाठी आल्या तर... होय आपल्याच देशात हे घडले आहे. या सुंदऱ्यांनी उन्हाच्या कडाक्यात बहादुरगडच्या रस्त्यांवर Vote For India चे नारे दिले. 

महत्वाचे म्हणजे या सुंदऱ्या एवढ्या मोठ्या संख्येने काही निवडणुकीसाठी आल्या नव्हत्या. तर त्या दिल्लीमध्ये होणाऱ्या मिस सुपरमॉडेल वर्ल्डवाईड ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजक संदीप हे बहादुरगडचे आहेत आणि दिल्ली बहादुरगडला लागूनच आहे. यामुळे संदीप यांनी विचार केला की, मतदान जागृतीसाठी का नाही या सुंदऱ्यांकडून आवाहन केले जावे. बस्...या विचारातून त्यांनी या सुंदऱ्यांना बहादुरगडच्या रस्त्यांवर आणले आणि त्यांना पाहण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनींसह नागरिकांची ही झुंबड उडाली. 

संदीप यांनी याआधी या सौंदर्यवतींना हा विचार सांगितला. त्याही कशाचा विचार न करता तयार झाल्या. मतदान जागृतीसाठी शाळकरी मुलांच्या फेरी काढण्यात आली. हा काही पहिलाच प्रकार नाही. या आधीही संदीप यांनी सामाजिक विषयांवर जागृतीसाठी अनेक देशांच्या सौंदर्यवतींना बहादुरगडच्या रस्त्यांवर उतरवले आहे. 

या सौदर्यवतींमध्ये रशियाची मरिना कॅरटिनोवा, अमेरिकेची जेनिस अलेक्झांड्रा, नेदरलँडची लकीश जेन बेबेल, बेलारुसची अलीना मैतसिशुकोवा यांच्यासह चीन, फ्रांस, भारत, इंडोनेशिया, जापान, जमैका, मलेशिया, मैक्सिको, म्यानमार आदी देशांच्या सौदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Haryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान