शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच! ज्या पक्षांनी ईव्हीएमवर घेतली होती शंका त्यांनीच केले कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 12:01 IST

EVM : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी  आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र...

नवी दिल्ली - भारतात मतदानासाठी ईव्हीएमचा वापर गेल्या दोन दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही काळापासून अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी  आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र आता एका संसदीय समितीने ईव्हीएममधील फेरफारीच्या शंका फेटाळून लावल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या समितीमध्ये ईव्हीएमविरोधात आघाडी उघडणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि बीएसपी या पक्षांच्या खासदारांचाही समावेश होता.

कार्मिक विभाग, कायदे आणि न्याय विभागाशी संबंधित समितीने आपला अहवाल शुक्रवारी राज्यसभेत सादर केला. यामध्ये बनावट मतदान बंद करणे, मतपत्रिकांच्या मोजणीसाठी होणारा विलंब आणि चुका दूर करण्यासाठी ईव्हीएमचे कौतुक करण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस आणि बीएसपीच्या खासदारांचा सहभाग असलेल्या समितीने स्थानिक निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मतदारांच्या सोईसाठी स्थानिक निवडणुकांमध्ये ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस या संसंदीय समितीने राज्य निवडणूक आयोगांना केली आहे. तसेच या शिफारशींना विरोधी पक्षांच्या कुठल्याही सदस्याने विरोध दर्शवला नाही.  

तसेच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट आल्यामुळे मतदारांचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता वाढली आहे. तसेच सुप्रीम कोर्टानेही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

विविध कसोट्यांमुळे ईव्हीएम मशिनमध्ये खोटे करणे अशक्य

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत धक्का; भाजपा नेत्याला ईव्हीएमवर शंका 

लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत, प्रकरण सुप्रीम कोर्टात

या समितीचे अध्यक्षपद भाजपा खासदार भूपेंद्र यादव यांच्याकडे आहे. तसेच या समितीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बसपाच्या खासदारांचाही समावेश आहे. याच पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, ईव्हीएमने केवळ निवडणूक प्रक्रियाच सुलभ केलेली नाही तर मतांची मोजणीसुद्धा वेगवान झाली आहे. तसेच ईव्हीएम  मतदारांसाठीसुद्धा सुविधाजनक आहे, असे या समितीने म्हटले आहे.

 

  

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनVVPATव्हीव्हीपीएटीParliamentसंसदtmcठाणे महापालिकाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी