आश्चर्य ! मोदींनी एकदाही म्हटलं नाही 'मित्रोंss'

By admin | Published: December 31, 2016 09:47 PM2016-12-31T21:47:53+5:302016-12-31T22:52:08+5:30

नरेंद्र मोदी नेहमीच्या स्टाईलप्रमाणे मित्रो किंवा मेरे प्यारे देशवासियो असं म्हणत भाषणाची सुरुवात करतील अशी अपेक्षा होती

Surprise! Modi did not say 'friends ss' | आश्चर्य ! मोदींनी एकदाही म्हटलं नाही 'मित्रोंss'

आश्चर्य ! मोदींनी एकदाही म्हटलं नाही 'मित्रोंss'

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात काय बोलतीय याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी ते आपल्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे मित्रो असं म्हणत भाषणाची सुरुवात करतील अशी अपेक्षा होती. मोदी भाषणात अनेकदा मधेच मित्रो म्हणत लोकांशी संवाद साधतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या संपुर्ण भाषणात त्यांनी एकदाही मित्रो म्हटलं नाही. सोशल मीडियावरही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात असून यावर चर्चासत्रच सुरु झालं आहे. भाषणाआधी ट्विटरवर तर #Mitron ट्रेंडदेखील सुरु झाला होता.
 
(मोदींनी 'मित्रो' म्हटलं तर 31 रुपयांत मिळणार बिअर)
 
इतकंच कशाला सोशल ऑफलाइन नावाच्या एका बारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर सवयीप्रमाणे मित्रो म्हटलं तर या बारमध्ये फक्त 31 रुपयांमध्ये बिअर किंवा एक ड्रिंक शॉट देण्याच्या ऑफरची घोषणा केली होती. जितक्या वेळी मोदी मित्रो म्हणतील तितक्या वेळा ही ऑफर लागू होणार होती. पण या बारमधल्या ग्राहकांना ही संधी मोदींनी दिलीच नाही. 
 
मोदी आज आपल्या भाषणात नोटाबंदीप्रमाणे काहीतरी मोठी घोषणा करतील असा अंदाज सर्वांनी लावला होता. पण मोदींनी अशी कोणतीही कठोर घोषणा न करता योजना जाहीर केल्या. 
 
नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगा कधी संपतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना मात्र या विषयावर मौन बाळगलं. 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल असं मोदी बोलले होते. मात्र बँकांचा सामान्य परिस्थितीत जाण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मोदींनी अप्रत्यक्षरित्या परिस्थिती सुधारायला वेळ लागेल असं मान्य केलं आहे. 
 
मोदींनी नवीन वर्षात बँकांना सामान्य परिस्थितीत नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितल आहे. संबंधित अधिका-यांना यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं असल्याचं मोदींनी सांगितलं. विशेष करुन ग्रामीण आणि दुर्गम भागात लक्ष देण्याची गरज असल्याचंही मोदी बोलले आहेत. 
 

Web Title: Surprise! Modi did not say 'friends ss'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.