शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य...हेल्मेट न घातल्याचा कार चालकाला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:50 IST

गोपा कुमार असे या चालकाचे नाव असून ते नेक्सॉन या कारमधून जात होते.

वाहतुकीचे नियम मोडल्याने चलन भरावे लागते ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मात्र, विना हॅल्मेट कार चालविल्यामुळे चलन भरावे लागल्याचे कधी ऐकिवात नसेल. केरळमध्ये हा प्रकार घडला आहे. कार चालविणाऱ्या चालकाला थांबवून त्याच्याकडून 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या चलनावर 'नो हॅल्मेट' असे लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे केरळ 100 टक्के साक्षर राज्य आहे.

गोपा कुमार असे या चालकाचे नाव असून ते नेक्सॉन या कारमधून जात होते. यावेळी त्यांना वाहतूक पोलिसांनी थांबविले आणि 100 रुपयांची पावती फाडली. या पावतीवर दंड 100 रुपये आणि त्याचे कारण लिहिले आहे. गोपी कुमार यांनी याबाबतचे फोटो फेसबुकवर टाकले आहेत. मात्र त्यांनी यामध्ये त्यांना कोणत्या कारणासाठी अडविण्यात आल्याचे सांगितलेले नाही. 

पोलिसांनी चलनावर 'नो हेल्मेट' असे लिहिले आहे. गोपा कुमार यांनी याचा फोटो फेसबुकवर टाकला आहे. ही घटना केरळच्या सस्थमकोट्टा येथील आहे. चावारा रोडवर पोलिसांनी कुमार यांच्या कारला थांबविले होते.

हा प्रकार पोलिसांची चुकी की ते एकावेळी अनेकांना थांबवितात यामुळे झालेला गोंधळ हे समोर आलेले नाही. कारण पोलिस एकावेळी अनेकांना थांबवितात आणि पावत्या देतात. यामुळे चुकुन गोपी यांना दुचाकीस्वार समजून कारवाई केली गेली असेल, अशी शक्यता आहे. काही काळापूर्वी गोव्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. रॉयल एनफिल्ड चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवून त्याला सीटबेल्ट न बांधल्याचे कारण दाखवत दंड आकारण्यात आला होता.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसKeralaकेरळ