शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग - लालूप्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 17:23 IST

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान घुसून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग आहे. 

ठळक मुद्देसर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंगचारी बाजूने हल्ले होत आहेतचीनचे आक्रमण वाढत चालले आहेयुद्धासाठी दहा दिवसांचा सुद्धा युद्धसाठा नाही

रांची, दि. 15 - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान घुसून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ते खरे सर्जिकल स्ट्राईक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात  करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. याचबरोबर चारी बाजूने हल्ले होत आहेत. चीनचे आक्रमण वाढत चालले आहे. केंद्र सरकारकडे युद्धासाठी दहा दिवसांचा सुद्धा युद्धसाठा नाही आहे, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.

गेल्यावर्षी सर्जिकल स्ट्राईक...गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी एकाही भारतीय जवानाला दुखापत झाली नव्हती. अत्यंत शूरपणे भारतीय जवान पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. यावेळी जवानांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने दहशतवाद्यांवर चांगलीच जरब बसली. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा किर्ती चक्राने सन्मान करण्यात आला. 

लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपत शस्त्रसाठा - कॅगभारताच्या संरक्षणव्यवस्थेविषयी गंभीर चिंता उत्त्पन्न करणारे दोन अहवाल महालेखापरिक्षकांकडून (कॅग) प्रकाशित करण्यात आले आहेत. कॅगच्या अहवालानूसार भारतीय लष्कराला सध्या मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासत असून, यदाकदाचित युद्धप्रसंग उद्भवल्यास लष्कराकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.