शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:48 IST

सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लखनऊ : सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांला सध्या कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. 

उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा पराक्रम केला आहे.   लखनऊपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्नावमधील एका सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. टॉर्चच्या प्रकाशात 32 जणांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलं. हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.शस्त्रक्रिया झालेले रुग्ण हे उन्नाव आणि शेजारच्या कानपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्ण आहेत. कानपूरमधील जगदंबा सेवा समिती या एनजीओने या रुग्णांना सरकारी आरोग्य केंद्रात आणलं होतं. सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. 

एनजीओने या सर्व शस्त्रक्रियांसाठी कानपूरमधील डॉक्टरला पाचारण केलं होतं. वीज गेल्यास जनरेटरची व्यवस्थाही संबंधित डॉक्टरकडून करण्यात येणार होती, असा दावा करण्यात आला आहे. त्यातच, संबंधित आरोग्य केंद्रातील सरकारी डॉक्टर या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार होता, मात्र त्यानेही दांडी मारली.

दरम्यान, दिवसा ऑपरेशन करण्याची सक्ती असताना रात्रीची वेळ का निवडण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे वीज गेल्यावर जनरेटर का सुरु करण्यात आलं नाही, तेही समजू शकलेलं नाही. त्याचप्रमाणे 24 तास रुग्णांवर देखरेख करणं आवश्यक असताना, त्यांना सकाळीच डिस्चार्ज दिल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.