शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:00 IST

न्यायालयाने सांगितले की, विशेष न्यायालयांच्या स्थापनेकरिता ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी शेवटची संधी केंद्र व महाराष्ट्र सरकारला देण्यात येत आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशावर दोन्ही सरकारांनी चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यायचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ विद्यमान न्यायालयांना विशेष न्यायालये म्हणून घोषित करून भागणार नाही, तर विशेष प्रकरणांसाठी नवी न्यायालये स्थापन करावी लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारला सुनावले. जर अतिरिक्त न्यायालये सुरू केली नाहीत, तर विशेष कायद्यांतर्गत अटक केलेल्या आरोपींवरील खटले रेंगाळून त्यांना जामीन देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजकुमार ठाकरे यांना विचारले की, आधीपासून अस्तित्वात असलेल्या न्यायालयांना विशेष न्यायालये म्हणून जाहीर करण्यात आले, तर अनेक खटले प्रलंबित राहतील. पायाभूत सुविधा, नवीन न्यायाधीश, कर्मचारी नेमणे, त्यासाठी सरकारने आवश्यक पदांना मंजुरी द्यावी.

न्यायालयाने सांगितले की, विशेष न्यायालयांच्या स्थापनेकरिता ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी शेवटची संधी केंद्र व महाराष्ट्र सरकारला देण्यात येत आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशावर दोन्ही सरकारांनी चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यायचे आहे.

‘विशेष प्रकरणांसाठी नवी न्यायालये हवीत’२३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एनआयए खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालयांची आवश्यकता अधोरेखित केली होती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एनआयए तपास करत असलेली प्रकरणे अत्यंत गंभीर स्वरूपाची असतात.त्यातील घटनांचा देशभरात परिणाम जाणवतो. या खटल्यांत शेकडो साक्षीदार असतात. मात्र, न्यायमूर्ती इतर खटल्यांमध्ये व्यग्र असल्याने या खटल्यांच्या खटल्यांचे कामकाज धिम्या गतीने होते. त्यामुळे अशा प्रकरणांच्या दैनंदिन सुनावणीसाठी विशेष न्यायालये स्थापन करणे आवश्यक आहे. नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा कैलाश रामचंदानी याच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. २०१९ मध्ये आयईडी स्फोटात १५ पोलिस शहीद झाले होते. त्यानंतर रामचंदानीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय