शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोषींच्या सुटकेविरोधात आता विशेष खंडपीठापुढे सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:57 IST

यापूर्वी २४ जानेवारी रोजी, गुजरात सरकारने सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना दिलेल्या माफीला आव्हान देणाऱ्या बिल्किस यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. 

नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह व न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बिल्किस बानो यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्या वकील शोभा गुप्ता यांच्यामार्फत नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले.यापूर्वी २४ जानेवारी रोजी, गुजरात सरकारने सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना दिलेल्या माफीला आव्हान देणाऱ्या बिल्किस यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. 

डिसेंबरमध्ये फेटाळली होती याचिका दोषींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेव्यतिरिक्त, बानो यांनी दोषींपैकी एकाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या १३ मे २०२२च्या आदेशाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्वतंत्र याचिकादेखील दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १३ मे २०२२ रोजी दिलेल्या आदेशात राज्य सरकारला ९ जुलै १९९२ च्या धोरणानुसार दोषीच्या मुदतपूर्व सुटकेच्या याचिकेवर विचार करून त्यावर दोन महिन्यांच्या कालावधीत निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

११ दोषींची निर्दोष सुटका बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व ११ दोषींची गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली होती. ते गोध्रा उपकारागृहात १५ वर्षांहून अधिक काळ होते. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीत बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय