शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा, AGRची थकीत रक्कम परत करण्यासाठी कोर्टाकडून 10 वर्षांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 14:28 IST

थकबाकी परतफेड करण्यासाठी काही अटींसह दूरसंचार कंपन्यांना ही वेळ देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं टेलिकॉम कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. समायोजित एकूण कमाई (एजीआर)प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करताना दूरसंचार कंपन्यांना चांगली बातमी दिली. एजीआर थकीत रक्कम परत करण्यासाठी कोर्टाने कंपन्यांना 10 वर्षांची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलला मोठा दिलासा मिळाला आहे. थकबाकी परतफेड करण्यासाठी काही अटींसह दूरसंचार कंपन्यांना ही वेळ देण्यात आली आहे.सुनावणीदरम्यान व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल यांनी कोर्टाला 15 वर्षांची मुदत देण्यास सांगितले, तर टाटा टेलिकॉमने आपली थकबाकी देण्यास 7-10 वर्षांच्या कालावधी लागणार असल्याचं न्यायालयाला सांगितलं. दूरसंचार विभाग (डीओटी) मात्र एजीआर थकबाकी भरण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या २० वर्षांच्या प्रस्तावावर ठाम राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना 31 मार्च 2021पर्यंत एजीआरच्या 10 टक्के थकबाकी परतफेड करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, दूरसंचार विभागाने एजीआरच्या थकबाकीची मागणी केली असून, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम आहे.खंडपीठाने दूरसंचार कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना चार आठवड्यांत थकबाकी देय देण्याचे वचन किंवा वैयक्तिक हमी देण्याचे निर्देश दिले आहेत. एजीआर थकीत हप्ते भरल्यास डिफॉल्ट झाल्यास त्यांना दंड, व्याजाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की दिवाळखोरी प्रक्रियेतून जाणा-या दूरसंचार कंपन्यांकडून स्पेक्ट्रमची विक्री करण्याबाबत राष्ट्रीय कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) निर्णय घेईल. 1.6 लाख कोटी रुपयांच्या थकबाकीची मुदत वाढवून देण्यासह अन्य मुद्द्यांवरील कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे.एजीआर म्हणजे काय?टेलिकॉम कंपन्यांना एजीआरचे तीन टक्के स्पेक्ट्रम फी आणि आठ टक्के परवाना शुल्क सरकारला द्यावे लागते. टेलिकॉम ट्रिब्यूनलच्या 2015 च्या निर्णयाच्या आधारे कंपन्यांच्या एजीआरची गणना केली जाते. ट्रिब्यूनलने त्यावेळी म्हटले होते की भाडे, कायमस्वरुपी मालमत्ता विक्रीतून मिळणारा नफा, लाभांश आणि व्याज अशा गैर-प्रमुख स्त्रोतांकडून होणारा महसूल वगळता इतरचा समावेश एजीआरमध्ये होईल. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय