शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तुरुंगात जायचे नसेल, तर लग्न करावे लागेल; सुप्रीम कोर्टाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 10:04 IST

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आहे. विवाह न केल्यास तुरुंगात रवानगी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारालग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी याचिकापंजाबमधील तरुणाविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा

नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आहे. विवाह न केल्यास तुरुंगात रवानगी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. पंजाबमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. (supreme court reprimanded that a young man was exploiting a woman)

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एएस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी झाली. पंजाबमधील एक उच्चवर्णीय मुलाने अनुसूचित जातीतील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिचे शोषण केल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मुलगी सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. 

गुंगीचं औषध देऊन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले, धमकावून अत्याचार केले; दोघांना अटक

२२ डिसेंबर २०२० रोजी दोन्ही कुटुंबात एक करार होऊन या दोघांच्या लग्नावर सहमती झाली होती. मात्र, मुलगी सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ती भारतात आल्यावर दोघांचे लग्न लावून देण्यात येईल, असे वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. यावर, हा करार कारवाईपासून बचावासाठी केला नाही ना, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. मात्र, वकिलांकडून न्यायालयाला याबाबत आश्वस्त करण्यात आले. 

सर्वोच्च न्यायालयाने या तरुणाच्या अटकेला स्थगिती देत, जर मुलाने लग्न केले नाही, तर त्याने तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, अशा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, २०१६ मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही तरुणी ऑस्ट्रेलियात गेली होती. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. 

पंजाबमधील उच्चवर्णीय मुलाने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, अनुसूचित जातीतील असल्यामुळे मुलीने प्रस्ताव फेटाळला. तरीही तरुणाने विवाहात कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यावर जोर देऊ लागला. तरुणी तयार नसल्याचे पाहून तिला गुंगीचे औषध देऊन तरुणाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काही आक्षेपार्ह छायाचित्रेही काढली. 

कालांतराने दोघे जण भारतात आले. प्रकरण पुढे वाढत गेल्यानंतर तरुणाविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तरुणाला जामीन देण्यास नकार दिला. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPunjabपंजाबHigh Courtउच्च न्यायालय