शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 10:16 IST

Arvind Kejriwal Supreme Court Petition News: अरविंद केजरीवाल लोकसभेचा निकाल कुठून पाहणार, हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

Arvind Kejriwal Supreme Court Petition News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता. या अंतरिम जामिनाची मुदत ०२ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, या याचिकेवरील तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 

वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी अंतरिम जामिनाच्या मुदतीत ७ दिवसांची वाढ मिळावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनात सात दिवसांनी वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यांच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना निर्णय घेतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

तुमच्या याचिकेवर सरन्यायाधीश यावर निर्णय घेतील

अरविंद केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅन आणि अन्य वैद्यकीय चाचण्या करायच्या असल्यामुळे आणखी सात दिवसांची मुदतवाढ मिळावी, या सवलतीचा दुरुपयोग होणार नाही, अशी ग्वाही ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिली. गेल्या आठवड्यात न्या. दत्ता असताना ही याचिका का केली नाही, असाही प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला, तेव्हा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नव्हते, असे सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, हा औचित्याचा मुद्दा असून सरन्यायाधीश यावर निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठाने स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान ०१ जूनला संपणार असून, त्या दिवशी अरविंद केजरीवाल यांना 'एक्झिट पोल'चे अंदाज बघता येतील. पण निकाल कुठे पाहणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने आरोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आले. राऊज अव्हेन्यू न्यायालयात त्यावर आरोपपत्रावर सुनावणी झाली. कथित मद्य धोरण घोटाळ्ळ्यात केजरीवाल आणि त्यांचा पक्ष गुंतला असल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणी ४ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेला अठरावा आरोपी विनोद चौहानशी केजरीवाल यांचे थेट पुरावे मिळाले असून त्याच्या नियुक्त्तीत केजरीवाल सामील होते. केजरीवाल या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा दावा आहे.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी