शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:47 IST

Arnab Goswami News : महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे.

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांविरोधात मुंबई पोलिसांनी एकाप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात या वृत्तवाहिनीची संचालक कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रा. लि. व अर्णब गोस्वामी यांनी केलेली रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस घेण्यास सोमवारी नकार दिला. ही याचिका महत्त्वाकांक्षी हेतूने केली असल्याचेही न्यायालयाने म्हटले.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या.  इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितले की, महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे.  टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीसह तीन वाहिन्या सहभागी असल्याचा दावा मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी केला होता. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.याचिका मागे घेण्यास दिली परवानगीसर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अर्णब गोस्वामी व रिपब्लिक टीव्हीच्या संचालक कंपनीने त्यांची याचिका मागे घ्यावी. याचिका मागे घेण्यासाठी न्यायालयाने याचिकादारांना परवानगीही दिली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्ही