शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोरॅटोरियमच्या काळात व्याजावर व्याज असंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 23:42 IST

सर्वोच्च न्यायालयाला सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीतील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या कर्ज हप्ते न भरण्याच्या सवलतीच्या (मोरॅटोरियम) काळात व्याजावर व्याज लावण्यात कोणतीही गुणवत्ता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. यात सरकारने हस्तक्षेप करण्याबाबत विचार करायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले.न्या. अशोक भूषण, न्या. एस. के. कौल आणि न्या. एम. आर. शाह यांच्या न्यायपीठाने म्हटले की, एकदा मोरॅटोरियम जाहीर केला असेल तर त्याचा अपेक्षित उद्देश साध्य व्हायला हवा. प्रत्येक गोष्ट बँकांच्या भरवशावर सोडून न देता सरकारने हस्तक्षेप करण्यावर विचार करायला हवा. व्याजावरव्याज आकारण्यात आम्हाला तरी कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीने बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, कर्जावरील व्याज पूर्णत: माफ करणे बँकांसाठी सोपे नाही. कारण बँकांनाही आपल्याकडील ठेवींवर व्याज द्यावे लागते. बँकांकडे १३३ लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यावर बँकांना नियमित व्याज द्यावे लागते. कर्जावरील व्याज माफ केल्यास बँकांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होतील.पुढील सुनावणी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.तरतुदीस विरोधआग्रा येथील निवासी गजेंद्र शर्मा यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या २७ मार्च रोजीच्या अधिसूचनेतील व्याज वसूल करण्यासंबंधीच्या तरतुदीस याचिकेत विरोध करण्यात आला आहे. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ ने दिलेल्या जीवनाधिकाराच्या विरुद्ध असल्याचे शर्मा यांनी याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय