शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' 50 कोटी मोबाईल नंबरला मिळाला 'आधार'; सेवा अखंडितपणे सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:39 IST

50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार नाही

नवी दिल्ली: आधार क्रमांक देऊन सिम कार्ड घेतलेल्या ग्राहकांची सेवा खंडित केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डबद्दल दिलेल्या निकालामुळे 50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे कोट्यवधी मोबाईल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केलं. आधार कार्ड देऊन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची सेवा तशीच सुरू राहील, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना मोबाईल कंपन्यांना आधार क्रमांक दिला आहे. मात्र खासगी कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली, त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. या ग्राहकांची सेवा बंद केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं होतं. मात्र आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या 50 कोटी ग्राहकांची सेवा अखंडितपणे सुरू होईल, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं दिलं. आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेले ग्राहक पुन्हा एकदा केवायसी पडताळणी करुन घेऊ शकतात, असं दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं निवेदनातून स्पष्ट केलं. मात्र ही पडताळणी करायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असेल. पडताळणीचा हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचा असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली आहे, त्यांची सेवा खंडित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला नाही, ही महत्त्वाची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल