शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट'ला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील; नवीन संसद इमारतीचा मार्ग मोकळा

By देवेश फडके | Updated: January 5, 2021 11:49 IST

पर्यावरण समितीने केलेल्या शिफारसी योग्य असल्याचे म्हटत 'सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट'ला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवला आहे.

ठळक मुद्दे'सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट'ला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदीलनवीन संसद इमारत आणि मंत्रालय बांधण्याचा मार्ग मोकळापर्यावरण समितीच्या शिफारसींना सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या गेलेल्या 'सेंट्रल विस्टा'ला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवला आहे. यामुळे आता संसदेची नवीन इमारत आणि मंत्रालय बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नवीन संसद बांधण्याचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, यावर आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण समितीने केलेल्या शिफारसी योग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावरणी झाली. 

'सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट'च्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने लांबणीवर टाकली आहे. केंद्र सरकारने डीडीए कायद्यांतर्गत आपल्या हक्काचा केलेला उपयोग योग्य असल्याचे सांगत, जमिनीच्या वापरासाठीच्या मास्टर प्लान २०२१ मध्ये करण्यात आलेल्या बदलांवरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, बांधकाम सुरू करण्यापूर्वी वारसा संरक्षण समितीचे प्रमाणपत्र घ्यावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारकडे बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे न्यायालयाकडून यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, यासंदर्भातील याचिका न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तर, सेंट्रल विस्टा प्रकल्पामुळे नुकसान होणार नसून, प्रतिवर्षी एक हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. 

'असा' असेल प्रकल्प

नवीन संसदेची क्षमता अधिक असून, नवीन संसद भवनात एकावेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील, तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसदेत एकूण १ हजार २२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. तसेच यासाठी ९७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 'टाटा प्रोजेक्ट लिमिटेड'कडे संसदेची नवीन इमारत उभारणीचे काम सोपवण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसद