शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे NBE ला आदेश; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:04 IST

मागील काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा २ वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नवी दिल्ली - NEET-PG २०२५ च्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. नीटी-पीजी २०२५ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन्स(NBE) ला दिलेत. २ शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या NBE चा निर्णय कोर्टाने फेटाळत हा मनमानी आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने NBE ला निर्देश देत म्हटलंय की, बोर्डाने पारदर्शकपणे परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करावी. १५ जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अद्यापही वेळ आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल असं कोर्टाने सांगितले.  जरी परीक्षा मंडळाने अधिक केंद्रे ओळखण्याचा संदर्भ दिला तरी त्याला अधिक वेळ लागू शकतो. ज्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो आणि सर्व परिणामी केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत असा प्रतिवादींच्या वतीने एक युक्तिवाद मांडण्यात आला आहे. हा युक्तिवाद देखील फेटाळण्यात आला आहे.

मागील काही वर्षापासून नीट पीजीसारखी परीक्षा २ वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जात होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची कठीण पातळी पूर्णपणे समान मानता येत नाही. ही परिस्थिती असमानता आणि मनमानी निर्माण करते. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारखेच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात ज्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते. 

२२ मे रोजी कोर्टाने जारी केले होते निर्देश

दरम्यान, नीट पीजी २०२४ च्या परीक्षेत पारदर्शकतेची मागणी करत विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली कारण २ शिफ्टमध्ये परीक्षा घेणे असमानता आहे. त्याशिवाय परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली. जेणेकरून निकालाचे आकलन आणि सुधारणा करता येईल. सुप्रीम कोर्टाने २२ मे रोजी सर्व खासगी आणि अनुदानित मेडिकल विद्यापीठांना त्यांचे फी डिटेल्स सार्वजनिक करण्याचे निर्देश देत परीक्षेत पारदर्शकता आणण्यास सांगितले होते. 

१५ जूनला प्रस्तावित नीट पीजी परीक्षा

परीक्षा वेळापत्रकानुसार, नीट पीजी २०२५ ची परीक्षा १५ जूनला आहे. याआधी परीक्षा २ शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बोर्डाला नव्याने परीक्षा कार्यक्रम जारी करावा लागणार आहे. एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय