शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समितीची शेतकरी संघटनांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 03:39 IST

आठ राज्यांमधील शेतकरी सहभागी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी आठ राज्यांतील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत चर्चा केली. कोर्टाने नियुक्त केलेल्या या समितीत तीन सदस्य आहेत. हे सदस्य शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करीत आहेत. समितीने शेतकऱ्यांसोबत आजवर सात बैठका घेतल्या आहेत.समितीने माहिती दिली की, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यातील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी शुक्रवारी समितीने चर्चा केली. यावेळी संघटनांच्या सदस्यांनी तीन कृषी कायद्यांबाबत त्यांचे म्हणणे सविस्तरपणे मांडले. समिती शेतकरी, त्यांच्या संघटना आणि शेतमाल उत्पादकांच्या संघटनांशीही चर्चा करीत आहे.१२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना स्थगिती देत समिती नियुक्त केली होती. या समितीला कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार समिती शेतकरी संघटना तसेच प्रतिनिधींची चर्चा करीत आहे. कायदे भांडवलधार्जिणेदोन महिन्यांहून अधिक काळ पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. हे कायदे भांडवलदार धार्जिणे असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी ते मागे घेण्याची मागणी केली आहे. या कायद्यांमळे देशातील सध्याच्या बाजारसमित्या उद्ध्वस्त होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.११ फेऱ्याही निष्फ‌ळया आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या परंतु यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. सरकारने शेतकऱ्यांना या कायद्यांवर दीड वर्षांसाठी स्थगिती आणण्याचे आश्वासनही दिले होते परंतु यातून शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. हे कायदे मागे जावे आणि शेतमालाच्या हमी भावासाठी कायदा करण्यात यावा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन