शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Case: राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:06 IST

मध्यस्तांकडून अपेक्षित गतीनं काम होत नसल्याचा आक्षेप

नवी दिल्ली: राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची जलद सुनावणी घेण्याची मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. राम जन्मभूमी प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या कामात विशेष प्रगती नसल्याचं विशारद यांनी याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी जलद सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी ८ मार्चला त्रिसदस्यीय मदतीची स्थापना केली. माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ते श्रीराम पंचू सदस्य आहेत. १५ ऑगस्टपर्यंत सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना समितीला न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र या समितीच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. या प्रकरणात जलद गतीनं सुनावणी होण्याची गरज असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून याचिकेवर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. न्यायालयानं नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या कामाच्या गतीबद्दल नाराजी व्यक्त करणारे विशारद अयोध्या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत. समितीकडून सुरू असलेले मध्यस्तीचे प्रयत्न थांबवून जलद गतीनं सुनावणी घ्यायची का, यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय