शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र योगायोग! चार महिन्यांत तीन सरन्यायाधीश बदलणार; रमणांनी केली नावाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:56 IST

रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतात.

देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण? यावरून आता पडदा हटला आहे. येत्या चार महिन्यांत देश तीन सरन्यायाधीश बदललेले पाहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. हे शिफारस पत्र रमणा यांनी कायदा आणि न्याय मंत्र्यांकडे सोपविले आहे. 

न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या नावाची शिफारस मान्य झाल्यास ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश बनतील. रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतात. सरन्यायाधीश म्हणून कोणताही निश्चित कार्यकाळ नसतो. परंतू सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय संविधानानुसार ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

विचित्र योगायोग...चार महिन्यांत देशाला तीन सरन्यायाधीश दिसणार आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत दोघेही निवृत्त होणार आहेत. असाच योगायोग पाच वर्षांनी म्हणजेच २०२७ मध्ये होणार आहे. 2027 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश येतील आणि जातील.

पहिली महिला सरन्यायाधीश मिळणार...परंपरा आणि प्रथेनुसार 27 सप्टेंबर 2027 रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील. यानंतर देशाला पहिली महिला  सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना या ३५ दिवस देशाच्या सरन्यायाधीश असतील. यानंतर न्यायमूर्ती पीएस नरसिंह 31 ऑक्टोबर 2027 पासून सहा महिने आणि तीन दिवसांसाठी सरन्यायाधीश होतील. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणा